Monday, March 22, 2010

तुझे पंख सारे



तुझे पंख सारे माझ्या आभाळाला व्यापणारे
मी न बोलताही माझ्या निळाइला जाणणारे

आता निळाइला गुलाबिशी जर
मनी पावसाची हलकीशी सर
तुझे माझे नाते सांग काय आहे ?
मोकळ्या आभाळीं वेडा वारा वाहे
मोकळ्या वारयाने उधळून दिले थेंब हे टपोरे

सावळ्या देहाची सावळी नजर
उसळते रक्त उर खाली वर
तरी आभाळाचा एक प्रश्न आहे
तुझे माझे नाते सांग काय आहे ?
मोकळ्या आभाळी ऊधळून दिले प्रश्न हे टपोरे !

आशुतोष जावडेकर